• Site Map
  • Accessibility Links
Close

वातावरण

धाराशिव जिल्ह्याचे वातावरण साधारणपणे कोरडे असते. पावसाळ्याचे वातावरण हे जुन महिन्याच्या मध्यापासून सुरु होऊन सप्टेबरच्या शेवटी संपते.ऑक्टोबर पासून नोव्हेंबर पर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबरच्या मध्यापासून ते जानेवारी पर्यंत हिवाळा असतो. फेब्रुवारी पासून ते मार्च पर्यंत वातावरण कोरडे असते. एप्रिल पासून ते जून पर्यंत उन्हाळा असतो. मराठवाड्यातील दुसऱ्या जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यामधील उन्हाळ्यातील तापमान कमी असते.