Close

जिल्हा प्रोफाइल

धाराशिव जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे. समुद्र सपाटीपासून जिल्ह्याची उंची ६०० mm इतकी आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, धाराशिव आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.
धाराशिव जिल्हा मराठवाडा विभागाच्या पूर्व बाजूला उत्तरेस १७.३५ ते १८.४० डिग्री अक्षांश आणि पूर्वेस ७५.१६ ते ७६.४० डिग्री अक्षांश मध्ये स्थित आहे.

धाराशिव जिल्हा खालील जिल्ह्यांनी व्यापलेला आहे.:

सोलापूर – दक्षिण-पश्चिम
अहमदनगर – उत्तर-पश्चिम
बीड – उत्तर
लातूर – पूर्व
बिदर & गुलबर्गा (कर्नाटक) – दक्षिण

जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).

२०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या खालील प्रमाणे दिली आहे.:

जनगणना २०११ जिल्हा सेन्सस बुक :  डाऊनलोड (पीडीएफ, 2.69एमबी)

तालुका निहाय ग्रामपंचायतीची संख्या दर्शविणारे विवरणपत्र- जिल्हा धाराशिव.:-

अ. क्र. तालुका ग्राम पंचायतीची संख्या
1 धाराशिव  110
2 तुळजापूर  107
3 उमरगा  80
4 लोहारा  45
5 कळंब  91
6 भूम  74
7 परंडा  72
8 वाशी  43