नळदुर्ग फोर्ट - नळदुर्ग
नळदुर्ग किल्ला – ऐतिहासिक पार्श्वभूमी :
उस्मानाबाद पासून ४६ कि.मी. अंतरावर असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रंचड किल्ला अडीच कि.मी.घेराचा असून अजूनही सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळून वाहणा-या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग राक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो. तीन – चारशे वर्षापूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते. याचा हा सबळ पुरावाच आहे. पावसाळ्यात या पाणी महालावरून पडणा-या पाहण्याचे विहंगमदृश्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
रस्त्याने
35 कि.मी तुळजापूर पासून 50 कि.मी उस्मानाबाद पासून 50 कि.मी सोलापूर पासून